black and white bed linen

घावनळे ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र

ग्रामीण विकासाची ओळख घावनळे

घावनळे हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. घावनळे हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे १४ किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे २६ किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये १४ वाड्या आहेत. गावची लोकसंख्या ३५१५ इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये अखंड हरिराम साप्ताह साजरा होतो. गावामध्ये ८ प्राथमिक शाळा आहेत. व ९ अंगणवाड्या आहेत.

गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे. त्यामध्ये 12 कार्यकारिणी सदस्य, ग्रामसेवक व ३ कर्मचारी आहेत.

पदाधिकारी आणि कर्मचारी

सरपंच
सौ आरती अनिल वारंग
उपसरपंच
श्री.लक्ष्मण वा. घाडीगावकर

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. भूषण दत्तात्रय चव्हाण

गावातील उपक्रम व इतर माहिती
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार कार्यक्रम
गावातील माजी सैनिकांचा सत्कार
कलमे वाटप

शाळेतील मुलांना दाखले वाटप

गांडूळ खत प्रकल्प
Led बल्ब प्रशिक्षण
चालू घडामोडी